कोकणातील शिमगा ; अडूरमध्ये पेटत्या होमातून धावतो संकासुर

0
341
बातम्या शेअर करा


गुहागर – कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याठिकाणी विविध प्रथा परंपरा देखील या शिमगोत्सवात पहावयास मिळतात. गुहागर तालुक्यातील अडूर गावात देखील एक अशीच अनोखी प्रथा पहावयास मिळते. याठिकाणी सहाव्या होळीच्या दिवशी संकासुर पेटत्या होमातून धावत पाठलाग करतो आणि अनोखी प्रथा पाहण्यासाठी जिल्ह्यातुन एकच गर्दी होत असते.

फाल्गुन पंचमीच्या दुसऱ्या दिवशी अडूर गावाची ग्रामदेवता श्री सुंकाई देवीचे खेळे येथील चतु:सीमेच्या घरोघरी घरे घेण्यासाठी भोवनीकरीता बाहेर पडतात. या चतु:सीमेच्या अंतर्गत पाच गावे येतात. त्यामध्ये कोंडकारूळ, बोऱ्या, बुधल, पालशेत व नागझरी या गावांचा समावेश होतो. या पाच गावातील भोवनी झाल्यावर पंचमीला रात्रीच्या वेळी अडूर भाटी मैदान येथे रात्रीचे खेळी खेळले जातात.
यावेळी पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार पाहण्यासाठी जिल्ह्यातुन अलोट गर्दी जमते. या खेळात आजपर्यंत एकदाही संकासुराचे पाय भाजल्याची घटना घडलेली नाही, यावरून आपल्याला येथील ग्रामदेवतेच्या जागृतपण दिसून येते. यावेळी दिवसभर भोवनीकरून आलेले खेळी त्याच नव्या दमाने खेळ खेळतात. यावेळी दोन होळी पहावयास मिळतात यात पहिली होळी कोकड होळी ही स्थानिक पिंपळदेवाची तर दुसरी होळी ही छोटी होळी ग्रामदेवतेच्या मंदिरात मानाचे स्थान असणाऱ्या पड्यादेवाची असते. यावेळी होळीभोवती पाच फेऱ्या मारून संकासुराच्या हातून होळीला अग्नी दिला जातो. यावेळी जो संकासुराला चिडवतो त्याचा पेटत्या होमातून संकासुर पाठलाग करतो आणि हा थरार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here