चिपळूण ; बोरगाव नळपाणी योजनेतील भ्रष्ट ठेकेदाराला भास्कर जाधवांकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न- निलेश राणे

0
256
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथील नळपाणी योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या आ. भास्कर जाधवांवर माजी खासदार निलेश राणे यांनी शरसंधान साधले.भाजपा प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी चिपळूण भाजपा संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले.

चिपळूण तालुक्यातील मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघातील बोरगाव नळपाणी योजनेचे भ्रष्टाचार प्रकरण सर्वश्रुत आहे. याप्रकरणी २८ लोकांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या नळपाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे समोर आले आहे. या योजनेतील २० लाख ४५ हजार १७८ रुपयांचा निधी कुठे गेला? असा सवाल उपस्थित करत ठेकेदार लक्ष्मण बिरादार याला आतापर्यंत काळ्या यादीत टाकले गेले पाहिजे होते. मात्र, तो काळ्या यादीत नाही. परंतु, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या ठेकेदाराला काळ्या यादीत न टाकण्याचं पत्र दिले गेले आहे. हा खरा ‘ठेकेदार’ अशा शब्दांत भास्कर जाधवांवर टीका केली. यामुळे या प्रकरणी भास्कर जाधवना देखील पार्टी करण्यात यावे, अशी मागणी न्यायालयात करणार आहोत, असे निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ते पुढे म्हणाले की, धामणी गावांतील रस्ता मजबुतीकरण, खडीकरण, डांबरीकरण व देव्हारे स्मशानभूमी प्रकरणी कामाअगोदरच बिले अदा केले गेल्याचे गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. यानंतर शाखा अभियंता आशुतोष सरदेसाई यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, या शाखा अभियंताला पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. यावरून जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या दोन्ही प्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करणार आहोत. तेथे न्याय मिळणार नाही, हे आम्हाला माहित आहे. मात्र, शेवटी प्रोटोकॉल आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशारा देतांना ठाकरे सरकारच्या बापाचा हा महाराष्ट्र नाही, अशा शब्दात ठाकरे सरकार विरोधात कडवट टीका केली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, नागेश धाडवे, माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू, माजी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, निलम गोंधळी, वैशाली निमकर, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळा चिपळूणकर, किशोर पालशेतकर, भाजप युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष मालप, कामगार आघाडी संयोजक विनोद कदम, संतोष भडवळकर, संदीप सुखदरे, श्रीराम शिंदे, अजय साळवी, रोहन साळवी, गणेश नलावडे, जतीन घटे, शुभम पिसे, प्रथमेश भोबस्कर, संदेश भालकर, महेश कांबळी आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here