गोव्यात या दोन पक्षाची नाचक्की…!!….नोटा पेक्षाही कमी मते

0
275
बातम्या शेअर करा


गोवा विधानसभा निवडणूकीत भाजप आणि काँग्रेस मध्ये चुरस असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात केलेले प्रयत्न अपुरे पडल्याचे दिसत आहे.*

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं पडली आहे.

विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. कारण 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. अजूनही मतमोजणी सुरु असून मतांचा वाटा पुढे-मागे होण्याची शक्यता आहे.

गोव्यात आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार भाजप 19 तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. मगोप ला 5 जागांवर आघाडी मिळाली असून आम आदमी पार्टी 1 जागांवर आघाडी आहे. गोव्यात शिवसेना- आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली होती.शिवसेना खासदार संजय राऊत हे गोव्यात तळ ठोकून होते. तसेच युवा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील शिवसेनेचा जोरदार प्रचार केला होता. मात्र मतदारांनी शिवसेनेला नाकारल्याचे दिसत आहे.*


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here