दापोली ; राष्ट्रवादीच्या माजी आमदारा विरोधात हक्कभंगाची तक्रार ,शिवसेना राष्ट्रवादी संघर्षाची चिन्हे

0
529
बातम्या शेअर करा

दापोली- रत्नागिरी जिल्हयात दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम व राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यात विकासकामांच्या भूमिपूजनावरून संघर्ष पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम यांनी थेट विधानपरिषद उपाध्यक्षांकडे संजय कदम यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावाची तक्रार दाखल केली आहे.

माजी आमदार संजय कदम हे आता आमदार नसताना देखील विधानसभा मतदारसंघात भूमिपूजन करत फिरत आहेत त्यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्तावासाठी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिले आहे अशी माहिती दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. नियम ७३ अन्वये हे पत्र विधानसभा उपाध्यक्ष महोदयांनी स्वीकारून पुढील कायदेशीर कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे दिले आहे तसेच आपण आमदार नसताना जे करून दाखवले ते आमदार असताना संजय कदमना करता आले नाही अशी टीका आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.  मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्याचे भूमिपूजन केले अशी अनेक भूमि पूजने नावाच्या मागे केवळ मा.आ.पुढे स्वताचे नाव लिहुन जनतेची दिशाभूल संजय कदम करत आहेत त्यांना आता ते आमदार नाहीत याचे भान नसावे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे अशी बोचरी टीका आमदार योगेश कदम यांनी केली.मुखमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर झालेला दापोली तालुक्यातील करंजाळी पावनळ, कात्रण रस्ता खडीकरण करणे व डांबरीकरण करणे या कामाचा कार्यादेश मिळाल्यावर संजय वसंत कदम (माजी आमदार) यांनी २५ जानेवारी २०२२ रोजी भूमिपूजन केले. या पाटीवर  मा.आ.संजयराव कदम, दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघ व राष्ट्रवादीच्या पदाधीकाऱ्यांची नावे असा मजकूर लिहून माझा आमदार म्हणून हक्क डावलून जनतेची दिशाभूल करत आहेत असा गंभीर आरोप आमदार योगेश कदम यांनी केला आहे २०१४ ते १९ या कालावधीत मंजूर झालेल्या विकासकामांची भूमीपूजन करण्याचा अधिकार देखील माजी आमदाराला नसतो एकदा पडल्यावर ते अधिकार आमदार म्हणून पुढे आपल्याकडे येतात. याची जणीवही संजय कदम यांना नाही.

नियम व अभ्यास न कळणारे गावठी माजी आमदार आता मी नाही जनताच म्हणते संजय कदम गावठी आमदार होता त्यांच्याकडून कोणत्याही नियमांची माहीती असण्याची अपेक्षा नाही अशी बोचरी टिका आमदार योगेश कदम यांनी केली.भूमिपूजन करायची पाटीवर पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांची नाव त्यामुळे जनाधार संपत चलल्याची जाणीव संजय कदम यांना झाल्याने जनतेची दिशाभूल करत आहेत अशीही टीका त्यांनी केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माजी आमदार संजय कदम येत्या काळात कोणती भूमिका या सगळ्या वादाविषयी घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.या पत्रकार परिषदेला भगवान घाडगे,उन्मेश राजे,प्रदिप सुर्वे,प्रकाश कालेकर, नदीम मुकादम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.                                      


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here