रत्नागिरी – ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा,चल फोन रख’, असे सांगत राजापूरचे आमदार राजन साळवी यांना धमकी दिल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पालाबाबत विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबांना मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
याबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिनांक १२ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. शहर पोलिसांनी एनसी दाखल करून घेतली आहे. आमदार राजन साळवी हे राजापूरचे शिसेनेचे आमदार म्हणून २००९ सालापासून कार्यरत आहेत. नाणार रिफायनरीला स्थानिक जनतेच्या सोबत राहून त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांना १० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ९२६५४४०५७६ या क्रमांकावरुन पहिला फोन आला.