त्याने मारली नगरपरिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी ….

0
609
बातम्या शेअर करा

चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगरपरिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेत ऐका इसमाने दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला. दळवटणे येथील महेश नारायण नलावडे असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सुदैवाने यात कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही.

महेश नलावडे हा चिपळूण शहरातील खेंड परिसरात राहतो. त्याला दोन लहान मुलगे आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी व त्याच्यामध्ये वाद झाले होते. त्यामुळे ते विभक्त राहतात. आज दुपारी तो दोन्ही मुलांना घेऊन बाजारपेठेत आला आणि सर्वांची नजर चुकवत थेट चिपळूण नगर परिषद इमारतीवर मुलांना घेऊनच चढला. इमारतीच्या गच्चीवर चढून त्याने प्रथम मुलांना खाली फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर परिषदेचे कर्मचारी यांनी चतुराईने धाव घेऊन दोन्ही मुलांना त्याच्या तावडीतून खेचून घेतले. परंतु, महेश नलावडे याने स्वतः मात्र इमारतीवरून उडी घेतली. सुदैवाने केबलचा अडथळा आला तसेच नगर परिषद कर्मचारी पोलीस व नागरिकांनी खाली ताडपत्री पकडून ठेवली होती. त्यामुळे तो थेट ताडपत्रित पडल्याने बचावला आहे. त्याला नगर परिषदेतील अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here