दापोली- दापोली मतदारसंघातील अहंकारी नेतृत्वा बरोबर आम्ही काम करणार नाही अशी ठाम भूमिका घेत दापोली मतदारसंघाचे शिवसेनेचे क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे,उप जिल्हा प्रमुख शंकर कांगणे, दापोली युवा सेना उप तालुका अधिकारी विकास जाधव,आणि खेड तालुका प्रमुख दत्ताराम गोठण या दापोली मतदारसंघातील शिवसेनेतील चार प्रमुख पदाधिकर्यांनी शिवसेना पक्ष पदाचे राजीनामे दिले आहेत.दि २६ रोजी दापोली येथे संदीप राजपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.या वेळी शंकर कांगणे,विकास जाधव उपस्थित होते.
आमची नाराजी शिवसेनेवर नाही, मात्र ज्या अहंकारी नेतृत्वात समाज भावना नाही असे नेतृत्व समाजाच्या काय हिताचे असे संदीप राजपुरे यांनी बोलताना सांगितले. मी दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख असतानाही मला ओळखले जात नाही. इतक्या वर्षात समाज हिताचे एकही काम नाही,फक्त निवडणुका आल्या की आपल्या स्वार्थासाठी समाजाचा वापर करून घेतला जातो अशी खदखद संदीप राजपुरे यांनी या वेळी वेक्त केली. कायम कुणबी समाजातील नेत्यांना चारचौघात हीन वागणूक देणे,त्यांना सतत अपमानित करणे हे आता कुणालाही सहन होण्यासारखे नाही त्या मुळे भविष्यात आमचं नेतृत आम्हीच उभे करणार असे शंकर कांगणे यांनी बोलताना सांगितले.