अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा १०० टक्के खरा – नारायण राणे

0
161
बातम्या शेअर करा

नवी दिल्ली – शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अडगळीतले नेते असा उल्लेख करत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

दरम्यान, भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची तडजोड पदांसाठीच झाली आहे.यामध्ये हिंदुत्वाचा आणि निष्ठेचाही भाग नाही. शिवसेनेने तर मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्त्वाला मूठमाती दिली. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही, अनंत गीतेंनी सांगितलं ते १०० टक्के खरं आहे,” असं नारायण राणे म्हणाले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here