चिपळूण- (सुकन्या घोणसेपाटील) – खरोखरच एखाद्याच्या आयुष्यात देवदूत येतो. आणि त्याचा आयुष्य बदलून टाकतो. कारण ज्या वेळेला एखादा संकटात असतो देवाचा धावा करत असतो त्या वेळेला जो व्यक्ती मदतीला येतो त्यालाच देवदूत म्हटल जात. आता अशाच एका देवदूत आजचा प्रसंग आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो आपला जीव धोक्यात घालत आणि जवळपास वीस फुटापेक्षा जास्त पाण्यातून चार ते पाच महिलांना वाचवतो होय हा देवदूतच आहे.
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील मंगेश पवार खेर्डी मधील माळेवाडी येथे त्यांच्या शेजारील एका घरामध्ये ज्या घराचा पूर्ण तळमजला पाण्याखाली जातो आणि घराच्या फर्स्ट फ्लोअरला पाणी लागतं त्या वेळी त्या घरात पाच महिला असतात आणि त्या आम्हाला वाचवा असा आकांत करत असतात अशा वेळेला त्यांच्या बिल्डिंगच्या शेजारी असणारा मंगेश हा उत्तम पोहणारा आणि धाडसी तरुण आपल्या जिवाची पर्वा न करता त्या महिलांना वाचविण्यासाठी त्या वीस फूट वाहत्या पाण्यात उडी घेतो आणि पोहत पलीकडे जातो यानंतर दोरीच्या साह्याने तो त्या पाच महिलांना त्या बिल्डिंगमध्ये टायरच्या ट्यूब वर बसून सुखरूप दुसऱ्या बिल्डींगमध्ये आणतो हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला मंगेश पवार यांनी देवदूत बनून हर्षदा वाघदुळे यांच्यासह घरातील इतर महिलांची त्या मोठ्या संकटातून सुटका केली त्या महिला आजही त्यांचे आभार मानत आहेत. त्यामुळे देवदूत म्हणजे काय ? देवदूत कसा असतो ? आणि देव ज्याला मदतीला पाठवतो त्याला देवदूत का म्हणतात याचा प्रत्यय आज सर्वच चिपळूनकरंना आला आहे.