गुहागर ; उमराठ ग्रामस्थांतर्फे चिपळूणच्या पूरग्रस्तांना जीवनोपयोगी वस्तूंची मदत

0
172
बातम्या शेअर करा



गुहागर – गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामस्थ व उमराठ ग्रामपंचायतच्या सहकार्याने चिपळूणच्या पूरग्रस्त भागातील नागरिकांना जीवनोपयोगी आवश्यक वस्तूंचे ४५० किटस वितरीत करुन मदतीचा सेवाव्रत उपक्रम नुकताच राबविण्यात आला. उमराठ ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचे सेवाव्रत राबविल्याबद्दल अभिनंदन होत आहे.
उमराठ गावातील वाड्यांमधील नागरिकांनी आर्थिक व धान्य स्वरूपाच्या लाखो रुपयांच्या मदतीने तांदूळ, गहू पीठ, डाळ, हरभरा, बिस्किट पुडा, टॉवेल ,लोणचे पॅकेट अशा जीवनोपयोगी आवश्यक वस्तूंची किटस तयार करून ४५० किटस चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्त भागातील व गावातील नागरिकांना नुकतेच मदत कार्याने वितरित करण्यात आले आहेत. चिपळूण तालुक्यातील पेठमाप तांबटआळी, कळंबस्ते करगावकरवाडी, कळंबस्ते,खेर्डी भुरणवाडी,बहादूरशेख नाका मधली आळी, चिपळूण बाजारपेठ, मिरजोळी तसेच चिपळूण पोलीस ठाणेच्या मुख्यालयातील पुरग्रस्तांचा मदत कक्ष आदी ठिकाणी उमराठ ग्रामस्थांतर्फे जीवनोपयोगी आवश्यक वस्तूंची किड्स वितरीत करण्यात आले. सदर मदत उपक्रमासाठी पूरग्रस्त भागातील नागरिक तसेच पोलिस विभागाचे अधिकारी व शासकीय अधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन उमराठ ग्रामस्थांना चांगले लाभले असे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले. उमराठ गावातर्फे मदतीच्या सेवावृत्ती उपक्रमात मदत वितरणासाठी उमराठचे माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरीवले, सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे, पोलीस पाटील वासंती आंबेकर, ग्रामपंचायतचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम तसेच उदय पवार, शशिकांत गावणंग, भिकू मालप, सोनू धनावडे, गंगाराम माईन, अशोक जालगावकर, रत्नाकर गावणंग, सागर गोरिवले , अजित गावणंग आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here