मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्याची खडी टाकुन मलमट्टी, अपघाताचीच शक्यता अधिक

0
153
बातम्या शेअर करा

संगमेश्वर – मुंबई गोवा महामार्ग पूर्णतः खड्ड्यात गेल्याचे पाहायला मिळत असुन गोळवली ते शास्त्री पुल येथील खड्डे फक्त खडी टाकून भरल्याने अपघाताचीच शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.

चिपळूण ते संगमेश्वर (आरवली )महामार्गाचे काम जोरदार गतीने सुरु असल्याचे पाहायला मिळते,मात्र मधे मधे सोडलेले पिस म्हणजे खड्ड्याचे साम्राज्यच झालेले दिसुन येते, वाहनचालकांना वाहन विस च्या स्पीडने ही चालवता येत नाही, या खड्ड्यांकडे पहायला ठेकेदार याला वेळ नाही.

शुक्रवारी 16 तारखेला शास्त्री पुलावरील आणि महामार्गवरील गोळवली बारागावच्या मंदिराजवलील मोठे खड्डे भरण्याचे काम फक्त खडी टाकुन करण्यात आले, ही खडी अधिकच रस्त्यावर इतरत्र पसरल्याने टु व्हिलर चालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

तर रसत्यवारील खड्डे खडीने भरल्याने वाहन चालकास दुरून खड्डा असल्याचे दिसत नाही, अचानक समोरील खड्ड्यातील खडी दिसल्याने चालकाने ब्रेक मारल्यास वाहन स्लिप होत असल्याचे पाहायला मिळते, त्यामुळे हे खड्डे नेमके कशासाठी भरले आहेत अशी विचारणा वाहनचालक करत आहेत.

एकवेळ खड्डे परवडले परंतु खड्ड्यात पसरलेली खडी काढुन टाकण्याची मांगणी वाहनचालकातून होताना दिसते,अन्यथा या खडी मुळे अपघाताची मालिका सुरु झाल्यास याची जबाबदारी कोणाची हे जाहीर करावे अशी मांगणी पुढे येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here