बातम्या शेअर करा

अहमदपूर – अहमदपूर -चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, विनायकराव पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले, विनायकराव पाटील दहा वर्षे आमदार, मंत्री ,असताना त्यांनी हा कारखाना डबघाईला आणला यांनी कारखान्याचे 13 कोटी 41 लाख 31 हजार 79 रुपये थकवले आणि कारखान्याचा वाटोळं केलं, आणि आता जनतेची दिशाभूल करून खोटे-नाटे आरोप करून रडीचा डाव सुरू केला, असा आरोप आमदार बाबासाहेब पाटील यांनी केला, यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला, साहित्याची विक्री केली कारखाना भंगारमध्ये काढला असा आरोप त्यांनी केला, माझ्यावर खोटेनाटे आरोप करून विनायकराव पाटील कोणत्या विद्यापीठात शिकलेत असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला.

सिद्धी शुगर कारखाना शेतकऱ्यांना न्याय दिला आहे या भागाची हरितक्रांती केली आहे.त्यामुळे शेतकऱ्याच नुकसान केलं नसल्याचा दावाही आमदार बाबासाहेब पाटील यांनी केला

विनायकराव पाटलांना खरचं शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी नळेगावचा कारखाना चालवून दाखवा किंवा नळेगावचा कारखाना विकत घ्यावा, अशा प्रकारचे जाहीर आवाहन त्यांनी विनायकराव पाटलांना केले, आपण कोणत्याही चौकशीला घाबरत नाहीत नियमाप्रमाणे कारखाना विकत घेतला आणि शेतकऱ्यांना न्याय दिला तसेच आतापर्यंत अकराशे कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केल्याचे त्यांनी सांगितले, भविष्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय देऊन जास्तीत जास्त हमीभाव देऊ असे ही त्यांनी सांगितले.
तसेच बिनबुडाचे आरोप करताना विनायकराव पाटील यांनी पुरावे घेऊन आरोप करावा असे त्यांनी आव्हान केले.तसेच विनायकराव पाटील यांनी आत्मदहन न करता, एखादा नवीन कारखाना काढून त्यांनी शेतकऱ्यांना आणखी न्याय द्यावा
अहमदपूर तालुक्यातील जनतेला भूलथापा मारून तालुका अडचणीत आणण्याचे काम विनायकराव पाटील यांनी केले. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच जनतेने 30000 मताने मला निवडून दिल्याचेही त्यांनी सांगितले त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही त्यांनी दिला, या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे गटनेते मंचकराव पाटील , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख शिवानंद हिंगणे ,माधवराव जाधव, होणराव पीजी, अझहर बागवान राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, प्रशांत भोसले अभय मिरकले, वीरेंद्र पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते चोपणे आदी पदाधिकारी उपस्थित होते


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here