अमूक या देशाला निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलं आहे, तुम्हाला इथे निवांतपणा मिळेल, एक वेगळी संस्कृती अनुभवायला मिळेल, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला मिळतील…हे वाचल्यावर तुम्हाला इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असेल, आपल्याला बुकिंग कसं मिळेल असे प्रश्न पडतील. मात्र ही काळजी सोडून द्या. कारण एवढं सगळं असलेल्या या देशाला सर्वांत कमी पर्यटक भेट देतात. दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेला हा चिमकुला देश आहे तुवालू. हवाई बेटं आणि आॅस्ट्रेलियाच्या मधोमध तुवालू आहे.
तुवालूला आहे काय?
थक्क करणारं निसर्गसौंदर्य
तुवालू हा तीन प्रवाळ बेटांनी आणि सहा कंकणद्वीपांनी बनलेला आहे. यातल्या प्रत्येक बेटाचं स्वत:चं असं एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला इथे काही ना काही खास गोष्टी पहायला मिळतातच. या सहा बेटांपैकी एक मुख्य कंकणबेटं म्हणजे तुवालूची राजधानी फुनफुटी. फुनफुटीची खासियत म्हणजे जगातला एकमेव कोणतीही कुंपणं नसलेला विमानतळ.
2. समृद्ध परंपरा आणि संस्कृती
सोळाव्या शतकात ब्रिटीशांच्या आगमनानंतर हा बेटांचा छोटासा देश जगाच्या नकाशावर आला. एकोणिसाव्या शतकात तुवालू ब्रिटीश वसाहतीचा भाग बनला. पण इथले मूळ रहिवाशी म्हणजे पोलिनेशियन्स. अजूनही व्यावसायिकतेचा स्पर्श झाला नसल्यामुळे असेल कदाचित पण या जमातीनं आपल्या परंपरा आणि संस्कृती जतन करु न ठेवल्या आहेत.
स्थापत्य
या देशात एका बाजूला तुम्हाला पामच्या झाडांचा उपयोग करु न बनवलेली खोपटासारखी घरं दिसतील. तर दुस-या बाजूला युरोपियन पद्धतीच्या इमारती.
4. चवदार खाद्यपदार्थ
तुवालूच्या लोकांच्या आहारातला मुख्य घटक आहे नारळ आणि मासे. इथल्या खास पदार्थांमध्ये नारळ, ब्रेडफूट आणि केळ्यांचा वापर करुन बनवलेला ‘पुलाका’ हा पदार्थ विशेष आहे.
हा देश काही दुर्गम नाही. तुम्ही फिजीला जाऊन तिथून पुढे तुवालूला जाऊ शकता. किंवा एअर पॅसिफिकची या बेटासाठी खास विमानसेवाही आहे. इंग्लिश हीच आता इथली अधिकृत भाषा झाल्यानं संवाद साधण्यातही अडचणी येत नाही.
तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल, मित्र-मंडळींबरोबर फिरायला जाणार असाल, एकदम आॅफ बीट ठिकाणाच्या शोधत असाल तर नक्की तुवालूचा आॅप्शन ट्राय करून पहायला हरकत नाही.