कोकण रेल्वे मार्गावरील ‘डबलडेकर’च्या वेळापत्रकात बदल

0
149
बातम्या शेअर करा

चिपळूण- कोकण रेल्वे मार्गावर पुढील महिन्यापासून पुन्हा सुरू होणाऱ्या डबल डेकर ट्रेनच्या वेळापत्रकात किंचितसा बदल करण्यात आला आहे. यामध्ये नाईट तसेच डे डबल पैकी केवळ ‘डे डबल डेकर’ धावण्याच्या दिवसांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. याबाबत कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबईतील लो. टिळक टर्मिनसे ते मडगाव मार्गावर (०१०८५/०१०८६) ही दिवसा धावणारी वाताकूनलित दुमजली ट्रेनच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आधी जाहीर केल्याप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव डबल डेकर सोमवार तसेच बुधवारी धावणार होती. मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार ती सोमवार तसेच गुरुवारी धावणार आहे. आधी जाहीर केल्यानुसार मडगाव – लो. टिळक टर्मिनस मार्गावर ही गाडी मंगळवार तसेच गुरुवारी धावणार होती. मात्र, सुधारित वेळापकानुसार मंगळवार तसेच शुक्रवारी धावणार आहे. या शिवाय गाडीचे थांबे तसेच वेळेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नसल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य संपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी म्हटले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here