खेड- ( प्रसाद गांधी )- कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरीवासीयांची हक्काची रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी त्वरित सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन रिपाईचे कोकण प्रदेश रिपाईचे संपर्क प्रमुख सुशांतभाई सकपाळ कोकण रेल्वेचे विभागीय वेवस्थापक याना देणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, ऐतिहासिक वास्तूंचा वारसा, सांस्कृतिक वारसा, दळणवळणाची साधने, पर्यटन हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे. कोकण रेल्वे हासुद्धा कोकणाचा मानबिंदू असून तो कोकणातील जनतेच्या अस्मितेचा ठसा आहे. या मार्गावर सर्वांत प्रथम सुरू झालेली रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून बंद आहे.
रत्नागिरी-दादर मार्गावर ५०१०४ या क्रमांकाने धावते. त्यामुळे रत्नागिरीकरांची हक्काची गाडी नाहीशी झाली आहे. त्यामुळे ही गाडी सुरू करावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात येत आहे तसेच पूर्वीप्रमाणेच दादर रत्नागिरी आणि परत या मार्गावर चालू करावी, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सकपाळ यांनी म्हटले आहे.