रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे हे दिलासादायक आहे. आज सायंकाळ पर्यंत शिथिलते बाबत नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे निर्बंध पॉझिटिव्हिटी रेट प्रमाणे ठरवण्यात येणार असून नवीन स्ट्रेनचा यावर परिणाम होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आणखी दोन गावे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. आजपर्यंत संगमेश्वर तालुक्यातील ५ गावात ६१०६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये फक्त १४१ रुग्ण सापडले आहेत. याना कोणते आजार होते? लसीकरण झाले का? याबाबत अभ्यास सुरु आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.