खेड ; कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात कोरोबाधितांची आहाराबात हेळसांड, १७५ रुपयांची सकस थाळी देण्याचे निर्देश असताना दिली जाते ९० रुपयांची थाळी

0
212
बातम्या शेअर करा

खेड – कोरोना रुग्णांना शासकिय नियमानुसार १७५ रुपयांचा सकस आहार देण्याचे निर्देश असताना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना केवळ ९० रुपयांची थाळी दिली जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. कोरोनाबाधितांच्या सकस आहारासाठी शासनाकडून १७५ रुपये मिळत असताना जर रुग्णांना ९० रुपयांची थाळी दिली जात असेल तर ८५ रुपये कुणाच्या खिशात जातात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खेड दौऱ्यावर आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आढावा बैठकीदरम्यान हा गंभीर प्रकार उघड झाला आणि कळंबणी उपजिल्हा रुजल्यातील कारभाराची पोलखोल झाली.

कोरोनाबाधित रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी त्यांना चिकन, दुध, अंडी असे
सकस आहार दिले जावे असे शासनाचे निर्देश आहेत. यासाठी शासनाकडून प्रती थाळी १७५ रुपये मोजले जातात. मात्र कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना रुग्णालय व्यवस्थापनाने नेमलेल्या ठेकेदाराकडून केवळ ९० रुपयांची थाळी दिली जाते. या थाळीतील जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याने बहुतांशी रुग्ण घरून आलेले जेवण घेणे पसंत करतात. कोरोनाधित रुग्णांसाठी शासनाकडून जर १७५ रुपये मिळत असतील तर उर्वरीत ८५ रुपये जातात कुठे याचा शोध घेणे गरजेचे आहे.
खेड दौऱ्यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले उदय सामंत यांच्याकडे याबाबत तक्रार आल्यानंतर तहसिल कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी याबाबत कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी यांच्याकडे यांना विचारणा केली. यावेळी उपस्थित असलेले अधिकारी समाधानकारक उत्तर देवू शकले नाहीत. उदय सामंत यांनी आढावा बैठकीतूनच जिल्हा अधिकाऱ्यांशी मोबाईलद्वारा संपर्क साधत चांगलेच खडे बोल सुनावले. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीचे बळी ठरलेल्या रुग्णांच्या सकस आहारासाठी शासन १७५ रुपये देत असताना त्यांना ९० रुपयांचे निकृष्ट दर्जाचे जेवण देणे हा प्रकार अतिशय संतापजनक आणि तितकास गंभीर असल्याने या प्रकरणची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होवून संबधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here