उमराठच्या कार्यक्षेत्रातील महसूल गाव उमराठ खुर्द(आंबेकरवाडी) कोरोना मुक्त

0
202
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ कार्यक्षेत्रातील उमराठ खुर्द (आंबेकरवाडी) शासनाच्या सर्व्हेक्षणानुसर कोरोना मुक्त गाव म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
गेल्या दीड वर्षांत कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या महसुल गावांचा पंचायत समिती गुहागरच्या वतीने गुहागर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व महसूल गावांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्या सर्वेक्षणानुसार वरील प्रमाणे दि. २५.०५.२०२१ च्या गट विकास अधिकारी(गट-अ), पंचायत समिती, गुहागर यांनी मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना पाठविलेल्या पत्रानुसार गुहागर तालुक्यातील फक्त ५ महसूल गावे गेल्या दीड वर्षांत एकही कोरोनाबाधीत व्यक्ती सापडली नाही. एक अभिमानाची बाब म्हणजे त्या ५ महसूल गावांमध्ये ग्रामपंचायत उमराठच्या उमराठ खुर्द (आंबेकरवाडी ) या महसूल गावाचा समावेश आहे.सदर कोरोना मुक्त उमराठ खुर्द(आंबेकरवाडी) राखण्यामागे उमराठ खुर्द, आंबेकरवाडीच्या सर्वच लहान-थोर नागरिकांचा आतापर्यंतचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. यामध्ये आंबेकरवाडीतील ग्रामस्थांचा उत्तम समन्वय, आंबेकरवाडीने एकत्रितपणे मुंबईकरांना कदाचित न पटलेले परंतू प्रसंगी घेतलेले कडक निर्णय, त्याला स्थानिकांपासून मुंबईकरांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद कारणीभूत ठरला आहे. या कामी आंबेकरवाडीतील वटार कृतीदल, वाडी कृती दल, ग्राम कृती दल यांचे सदस्य तसेच कोरोना योद्धया पोलीस पाटील वासंती आंबेकर, अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, अंगणवाडी मदतनीस निलम जोशी, आरोग्य सेविका रूचिता कदम तसेच वाडी प्रमुख, पदाधिकारी आणि सर्वच ग्रामस्थांचा मोलाचा सक्रिय सहभाग लाभला आहे. ग्रामपंचायत उमराठच्यावतीने उमराठ खुर्द (आंबेकरवाडी) ग्रामस्थांचे आणि सदर बाबतीत उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. असेच लोकसहभागातून उत्तमोत्तम कार्ये उमराठ खुर्द आंबेकरवाडी मध्ये होवोत आणि ग्रामपंचायत उमराठला सतत सहकार्य करावे असे आवाहन सरपंच, जनार्दन आंबेकर यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here