गुहागर ; असगोली हुंबरवाडीत घरावर वीज कोसळली

0
446
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील असगोली हुंबरवाडीतील शशिकांत कावणकर आणि सुधीर कावणकर या दोघांच्या घरात वीज शिरली. त्यामुळे घरामधील वायरींग आणि स्वीचबोर्ड जळून खाक झाले. केबल टी.व्ही.च्या वायरमधुन ही वीज अन्य घरात जावून सुमारे १७ घरांमधील सेटटॉपबॉक्स आणि टी.व्ही. जळले आहेत. या घटनेत सुदैवाने प्राणहानी झाली नाही. जळलेल्या केबल पायावर उडून सुधीर कावणकर किरकोळ जखमी झाले आहेत.गुहागर परिसरात मंगळवारी, दुपारी दरम्यान वीजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. त्यावेळी असगोली हुंबरवाडीतील कावणकरांच्या घराशेजारी नारळाच्या बुंधात वीज पडली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here