असा केला कोरोनाबाधित पतीचा वाढदिवस साजरा ; पत्नीने दिली अनोखी गिफ्ट

0
350
बातम्या शेअर करा

चिपळूण -पतीचा वाढदिवस आहे पण पतीच कोरोनाबाधित असल्यामुळे खूप सारं टेन्शन आहे तरी सुद्धा मनात कोणत्याही परिस्थिती पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्धांगिनीची तळमळ सुरू आहे पती कोरोना बाधित आहे मग वाढदिवस साजरा तरी कसा करायचा ह्या विचाराने मन अस्वस्थ होते अखेर मनांत ठाम विचार करून त्या पत्नीने रुग्णालयातच केक कापून पतीचा वाढदिवस साजरा करून पतीला दिली आगळी वेगळी गिफ्ट .

आणि हे सारं पाहून पतीच्या चेहरा आनंदाने फुलला .हे असं घडलंय मुबई मुलुड येथील एका खाजगी रुग्णालयात आणि ते सुद्धा माजी मंत्री आ भास्कर जाधव यांचे सुपुत्र रत्नागिरी जिल्हा परिषद अद्यक्ष विक्रांत जाधव यांचा बाबतीत .आज त्यांचा वाढदिवस आहे आणि ते कोरोना पॉझिटिव्ह असून मुबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी सुद्धा त्याच रुग्णालयात उपचार घेत आहे मात्र आज विक्रात जाधव यांचा वाढदिवस असल्यामुळे अनेकजण फोन वरून शुभेच्छा देत लवकर बरे व्हा असे त्यांना सांगत होते तर पत्नीने हॉस्पिटलमध्ये त्यांचा आगळावेगळा वाढदिवस साजरा केला यावेळी हॉस्पिटलमध्ये केक कापण्यात आला तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारी यांनी पी पी ई किट परिधान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कोरोना रुग्ण असूनही पत्नीने केलेल्या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाने विक्रात जाधव भारावून गेले त्यानी पत्नी व हॉस्पिटलचे मनापासून कोतूक केले .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here