जळकोट ; नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्य वृक्ष लागवड

0
205
बातम्या शेअर करा

जळकोट – (प्रा. डॉ. नामदेव राठोड) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जळकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसा निमित्य ग्रामपंचायत कार्यालय तिरुका येथे काँग्रेस पक्षाचे जळकोट तालुकाअध्यक्ष तथा तिरुका ग्रामपंचायतीचे उपसरपंच मारोती पांडे व जळकोट शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष मारोती पांडे म्हणाले आज पर्यावरणाची किती गरज आहे हे कोव्हिड – 19 या महामारीने दाखवून दिले आहे. पत्येक मानसाला आज शुद्ध ऑक्सीजनची किती आवश्यकता आहे. पर्यावरण पुरक शुद्ध ऑक्सिजन ‘ हवे असेल तर प्रत्येकानी एक वृक्ष लागवड करून त्यांचे सर्वधन केले पाहिजे तरच आपण आपल्या पर्यावरणाचा आणि परिसराचा समतोल राखणार आहोत. नाही तर येणाऱ्या काळात आपल्या प्रत्येकाला ऑक्सिजन विकत घेतल्या शिवाय पर्याय उरणार नसल्याचे बोलताना मत व्यक्त ‘केले. यावेळी जळकोट शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश धुळशेटे बोलताना म्हणाले .
आज घडीला संपुर्ण देश अनुभवत आहे. की ऑक्सिजन अभावी कितेक रुगणाला आपला जीव गमवावा लागला.
आज अक्सिजनची किती आवश्यकता आहे. म्हणूण आपना प्रत्येकाला शुद्ध हवा हवी असेल तर प्रत्येकानी एक तरी वृक्ष लागवड करून , वृक्ष लागवडीचा प्रत्येक गावा गावात जनआंदोलन उभा केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा रक्षण केला जाईल असे बोलताना म्हणाले.यावेळी उपस्थित.संग्राम नामवाड ( सरचिटणीस :-युवक काँग्रेस उदगीर-जळकोट विधानसभा )
व्यंकटराव खटके मामा (मा.सरपंच)
गंगाधर गिरदवाड मद्देवाड सर
( मुख्याध्यापक जि प )मधुकर हलकरे ,मुंडे सर ( माजी. मु.अ )
तुळशीराम पांडे ,उध्दव पाटील
नागेश पवार ,प्रा.दत्ता सवारे ,
कोंडीबा जाधव,माणिक पंदीलवाड आदीसह गावातील प्रतिष्ठीत जेष्ठ मंडळी उपस्थित होते..


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here