गुहागर ; आजपासून कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरु शुंगारतळी येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त

0
453
बातम्या शेअर करा

गुहागर – कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून ९ जूनपर्यंत कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरु झाली असल्याने गुहागर शहरासह शुंगारतळीची बाजारपेठ ओस पडली आहे. शुंगारतळी , आबलोली, तळवली या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१ जानेवारीपासून राज्यात कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत मात्र राज्यातील जे तालुके रेडझोन मध्ये आहेत तिथले निर्बंध मात्र आवश्यकतेनुसार आणखी कडक करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा हा त्या पैकीच एक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनबाधितांची संख्या वाढतच चालली असल्याने प्रशासनाला जिल्ह्यात कडक लॉकडाउन चा निर्णय घ्यावा लागला असून आजपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ ते ९ जानेवारी दरम्यान जिल्ह्यात पर्यायाने गुहागर तालुक्यात कडक लॉक डाउन असणारा आहे. या दरम्यान मेडिकल इमर्जन्सी व अंत्यसंस्कार या दोन बाबी वगळता तालुक्यात कुणालाही प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे आरटीपीसीआर टेस्ट केल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. दुधाची डिलिव्हरी वगळता इतर कोणत्याही वस्तूचीने आण करता येणार नाही. या दरम्यान कोणते व्यवसाय सुरु ठेवता येथील याची यादी जाहीर केलेली आहे. त्या व्यतिरिक्त अन्य सर्व व्यवस्थापने बंद राहतील.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधाचे नागिरकांनी पालन करावे, जे या नियमनाचे भंग करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असही यांनी सांगितले.कडक लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे.

गुहागर तालुक्यातील महत्वाचे ठिकाण शुंगारतळी येथे पोलीस प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत आहेत. कुणालाही प्रवेश न देण्याचे आदेश असल्याने या ठिकाणी वाहन चालक आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक खटकेही उडू लागले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here