चिपळूण ; कोंढे येथे गोवा – बनावट विदेशी मदयाचा मुददेमाल जप्त

0
1264
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील कोंढे येथे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने छापा टाकून 176640 / रू. किमतीचा गोवा – बनावट विदेशी मदयाचा मुददेमाल जप्त केला.
चिपळूण तालुक्यातील कोंढे येथे गोवा बनावट विदेशी मदयाचा साठा केला असल्याची माहीती भरारी पथकाला खब यामार्फत मिळाली या नुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, प्र. अधिक्षक व्ही. व्ही. वैदय यांच्या मार्गदर्शनाखाली भरारीपथकाने धाड टाकली यावेळी गोवा बनावट गोल्डन एस व्हीस्की चा महाराष्ट्रातील किमतीनुसार 176640/ ‘- रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला.
ही कारवाई भरारीपथकाचे उपनिरीक्षक किरण पाटील, सुनील सावंत जवान विशाल विचारे, सागर पवार यांनी केली. याप्रकरणी गजानन शंकर जमदाडे (वय 57 वर्षे रा. कोंढे चंदनवाडी ता. चिपळूण जि. रत्नागिरी) व प्रितेश प्रदीप देवळेकर (वय 37 वर्षे रा. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्हयात लॉकडाउन कालावधीत अवैध गावठी दारूची व गोवा बनावट मदयाची विक्री होवू नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे प्र. अधिक्षक व्ही. व्ही. वैदय यांनी सांगितले


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here