खेेेड- (राकेश कोळी ) -मुंबई गोवा महार्गावरील भरणे नाका के वेरळ दरम्यान अपुर्णावस्थेतील असलेल्या महामार्गावर यंदाच्या पावसात चिखलाचे साम्राज्य होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
महामार्गावरील जगबुडी पूल ते वेरळ येथील रेल्वे स्थानकाच्या फाट्यापर्यंत असलेला थोडासा भाग हा महामार्ग विभागाने अर्धवट अवस्थेत सोडल्याचे पहावयास मिळत आहे. या मार्गावर थोडासा रस्ता हा कॅाक्रीटीकरणाने पुर्ण करण्यात आला आहे. मात्र या कॅाक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी मातीच्या रस्त्यातूनच जावे लागते. येत्या दोन दिवसात मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकणार असून लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होईल. पण पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्यात येणारी रस्त्याची कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे मुबंई गोवा महामार्गावर दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाल्यास महामार्गावरील भरणे नाका ते वेरळ या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरणार हे मात्र नक्की. मात्र या अर्धवट कामाचा नाहक त्रास वाहनधारकांसह स्थानिकांना सहन करावा लागणार आहे. यामुळे तालुक्यांतील नागरिकांनी या मुजोर महामार्ग ठेकेदार कंपनीचा त्रास आणखी किती सहन करायचा असा प्रश्न आता ऊपस्थित होत आहे.