टीव्ही 9 मराठीचे पत्रकार झाले रुग्णवाहिकीचे सारथी !

0
193
बातम्या शेअर करा

बेळगाव : असं म्हणतात की मानवतेपेक्षा काहीही मोठं नसतं. या मूल्यानुसार जगात अनेक लोक वागतातसुद्धा. पैसा, प्रतिष्ठा आणि मानवता यामध्ये अनेकजण मानवतेला प्राधान्य देतात. जगात माणुसकी आणि स्वास्थ हेच सर्वात श्रेष्ठ आहे; याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. सध्या कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. त्यातच पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत, असे प्रकारही पाहायला मिळाले आहेत.

रुग्णाला वाचवण्यासाठी पत्रकाराची तळमळ : बेळगावमधील पत्रकाराने एक असे काम केले आहे, ज्याची सगळीकडून दखल घेतली जात आहे. सर्वांनी त्यांच्या कामाची वाहवा केली आहे. बेळगावात रुग्णवाहिका चालक नसल्यामुळे रुग्णाला वेळेवर उपचार मिळावे यासाठी आणि रुग्णाचा जीव वाचावण्यासीठी टीव्ही-9 चे पत्रकार विश्वनाथ येळ्ळूरकर यांची तळमळ अनेकांना चांगलीच भावत आहे. रुग्णाला वेळेवर उपचार मिळणं गरजेचं होते. त्यामुळे रुग्णवाहिका चालकाच्या कर्तव्यनिष्ठेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

रुग्णाला तत्काळ उपचार मिळाले नाही तर तो दगावण्याचा धोका असतो. रुग्णवाहिकेचा वाहनचालक नसल्याची माहिती पत्रकार विश्वनाथ आणि त्यांचे सहकारी मित्र महेश गावडे यांना मिळताच त्यांनी रुग्णवाहिकेचा चालक बनत गाडी चालवली आहे. रुग्णवाहिका चालक मिळाला नाही म्हणून शिवसेनाची रुग्णवाहिका घेवून ते बेळगाव ते सावंतवाडीला गेले आणि एका गरोदर महिलेला मदत केली. सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना व उपलब्ध रुग्णवाहिकांवर ताण आला असतानाच पत्रकार रुग्णवाहिका चालक बनला आहे.
रुग्णाला प्राधान्य देणं मला गरजेचं वाटलं. त्यामुळे मी हे काम केलं असल्याचे त्यांनी सांगितल. एनयुजेमहाराष्ट्र चे मार्गदर्शक मा शिवेंद्रकुमार व राज्याध्यक्ष शीतल करदेकर यांनी विश्वनाथ येळ्ळूरकर यांचे या संवेदनशील कार्याबद्दल अभिनंदन केले आहे.
रुग्णवाहिकेसाठी संपर्क क्रमांक 9036665297


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here