तोक्ते वादळाचे खेडमध्ये दोन बळी ; तुटलेल्या वीज वाहिनी चा धक्का लागून पतीपत्नीचा मृत्यू

0
404
बातम्या शेअर करा

खेड – तोक्ते चक्रीवादळामुळे तुटून रस्त्यावर पडलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीचा धक्का बसून बोरज येथील पती पत्नीचा दूर्देवी मृत्यू झाला . ही दूर्घटना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बोरज जि.प. शाळेजवळ घडली
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बोरज घोसाळकरवाडी येथील प्रकाश गोपाळ घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना प्रकाश घोसाळकर हे दोघे दूचाकीने लोटे येथे गेले होते .लोटे येथील काम संपवून ते सायंकाळी परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली . त्यांची दुचाकी जि. प शाळा बोरज येथे आली असता वादळामुळे रस्त्यावर तुटून पडलेला ३३ केव्ही वीज वाहिनीचा जबरदस्त धक्का या दोघांना बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला .
अचानक घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . या घटनेची पोलिसांनी नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here