चिपळूण – लोकशाही चॅनलचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी ,दैनिक सागरचे प्रतिनिधी यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल अनेकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
चिपळूण तालुक्यातील शिरगाव सुपुत्र निसार महंमद शेख गेली 20 पत्रकारिता करीत असून त्यानी आतापर्यंत अनेक सामाजिक विषयाला न्याय मिळवून दिला आहे लोकशाही चॅनलच्या माध्यमातून गुटखा स्टिंग ऑपरेशन करून वास्तव चित्र सर्वांसमोर आणले होते आतापर्यंत त्यांना दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये आता मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे अनेकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे