खेड – मुंबई -गोवा मार्गावरील लोटे एमआयडीसी मध्ये आज सकाळी पुन्हा एकदा स्फोट झाला लोटे येथील समर्थ केमिकल्स मध्ये हा भीषण स्फोट झाला हा स्फोट रिअॅक्टर चा झाला असे कंपनी कडून सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी गेल्या 3 महिन्यातील या एमआयडीसी मधील स्फोट होण्याची ही तिसरी घटना आहे. या स्फोटात 9 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत असून 6 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन तासांनी आग विझण्यात प्रशासनाला यश आले या ठिकाणी खेड येथील मदत ग्रुप व त्यांच्या सहकारी वर्गाने ही आग विझवण्यासाठी मदत केली तर या स्फोट बद्दल अधिक तपास खेड पोलीस करत आहे..