खेड- -मुंबई – गोवा महामार्गावर एका मालवाहू ट्रकला आग लागलीय.मुंबई ते गोवा असा हा मालवाहू ट्रक जात असताना लोटे एमआयडीसी येथे या ट्रकच्या खालच्या बाजूस आग लागली आणि नंतर या आगीनं रौद्र रुप धारण केला.भर दुपारच्या सुमारास ही आग लागलीय या आगीत ट्रक जळून खाक झालाय.ही आग विझवण्यासाठी मदत गृप पुढे आलाय गृपचे रोहीत इनकर आणि लोटे एमआयडीसी अग्नीशमन दल यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेत.आगीत जिवीतहानी झाली नसली तरी ट्रक जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालय.