चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था प्रजासत्ताक दिनी प्रशासनातर्फे सन्मानित

0
253
बातम्या शेअर करा


चिपळूण – कोरोना काळात प्रशासनास उत्तम सहकार्य केले. या माध्यमातून कामथे रुग्णालयाचे रुपडे पालटण्यास हातभार लागल्याबद्दल प्रजासत्ताकदिनी प्रशासनातर्फे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला गौरविण्यात आले. हा सन्मान प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते चिपळूण नागरीच्या स्वप्ना यादव यांनी स्विकारला. या सन्मानाबद्दल सर्वसामान्यांमधून चिपळूण नागरीवर कौतुकचा वर्षाव होत आहे.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही ‘आपली माणसं आपली संस्था’ या ब्रीदवाक्याप्रमाणे सर्वसामान्यांना सेवा देत आहे. यामध्ये गरजूंना तत्काळ कर्ज याचबरोबर सुशिक्षित तरुणांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी कर्ज पुरवठा करीत आहे. यामुळेच हजारो तरुण स्वावलंबी झालेले पहावयास मिळत आहेत. संस्थेचे कामकाज यशस्वीपणे करीत असताना समाजपयोगी उपक्रमांमध्ये देखील ही संस्था मागे नसल्याचे दिसून येत आहे. ही सर्व यशस्वी वाटचाल संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. कोरोना काळातही या संस्थेने आपले सामाजिक दायित्व जपले आहे. यामुळेच कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटण्यास मदत झाली. तत्पूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी रुपयांचा निधी देऊन महाराष्ट्रात इतका निधी देणारी ही एकमेव संस्था ठरली. या सर्व कामगिरीची दखल घेऊन प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा गौरव करण्यात आला. हा सन्मान संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडून स्वीकारला. यावेळी आमदार शेखर निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी व तहसीलदार जयराज सुर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते उपस्थित होते.

तसेच प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला माजी आमदार रमेश कदम, सदानंद चव्हाण, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंदरथ खताते, जिल्हाप्रमुख सचिन कदम, सभापती धनश्री शिंदे, सदस्य राकेश शिंदे, नगरसेवक शशिकांत मोदी, उमेश सकपाळ, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, विलास चिपळूणकर, सचिन साडविलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, निवासी नायब तहसिलदार तानाजी शेजाळ, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here