गुहागर; अखेर कोविशिल्ड लस दाखल उद्या 100 जणांना लस दिली जाणार

0
422
बातम्या शेअर करा

गुहागर -गेल्या वर्षापासून कोरोनाचे सावट संपुर्ण जगावर आहे. राज्यात कोरोनाची लस पोहोचली असून गुहागर तालुक्यातील नागरिकांनसाठी आनंदाची बातमी आहे. गुहागर तालुक्यासाठी सिरमची कोविशिल्ड लस पोहचली आहे. गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयातील कोल्ड स्टोरेज युनिटमध्ये कोविशिल्ड लस पोहचली आहे. गुहागर तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात एकूण ११० डोसेस पोहचले असून पहिल्या टप्यात १०० जणांना लस दिली जाईल.

भारतामध्ये मार्च २०१९ पासून कोरोनाचे सावट आहे. हे कोरोनाचे सावट अखेर नवीन वर्षात कमी करुन कमीत- कमी वेळात लस शोधण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवले आहे. तज्ज्ञांच्या समितीने दोन लशींच्या (कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड) आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्याला कोरोना लसींचे वाटप पुर्ण केले आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून रत्नागिरी जिल्ह्याकरीता सोळा हजार कोविशिल्ड लसीचे डोसेस पाठवण्यात आले असून त्याचे वितरण आरोग्य प्रशासनाकडून पुर्ण झाले आहे. जिल्ह्यावरुन प्रत्येक तालुक्यामध्ये कोविशिल्ड लस पाठविण्याचे काम देखील पुर्ण झाले आहे. लाभार्थ्यांना लस वितरण करेपर्यंत तापमान मेंटेन केले जाणार आहे. १६ तारखेला ही लस वितरित केली जाणार आहे. गुहागर तालुक्यात एका केंद्रातुन हे लसीकरण होणार आहे.. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांना डोस दिले जाणार असून त्यानंतर आशा, अंगणवाडी वर्करचा समावेश केला आहे.
उद्या देण्यात येणारी लस ही ग्रामीण रुग्णालयातील 45 कर्मचारी तर आबलोली व कोळवली येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. गुहागर ग्रामीण रुग्णालयात ही लस देण्यासाठी आरोग्यविभागाचे प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत लस देण्यात येणार आहे. केंद्रांवर प्रतिक्षा कक्ष केला गेला आहे. लस दिल्यानंतर संबंधितांना प्रतिक्षा कक्षात ३० मिनिटे ठेवले जाणार आहे. अशी माहिती गुहागर ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. जयंत दाभोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर ग्रामीण रुग्णालयात खास टीम तयार करण्यात आली आहे.अशी माहिती गुहागर ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. जयंत दाभोळे यांनी दिली


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here