दापोली -रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पुणे जिल्ह्यातील औंध येथून निहाल चव्हाण ,अक्षय राखेलकर ,उबेस खान ,रोहित पलांडे ,विकास श्रीवास्तव ,मनोज गावंडे असे सहा पर्यटक फिरण्यासाठी आले होते हे पर्यटक आज दुपारच्या वेळेस दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने या सहा पर्यटकांपैकी तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला सहा पर्यटकांपैकी तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले असून त्यांना अधिक उपचारासाठी दापोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे-