चिपळूण ;बोगस नोटांचा कारखाना ,८५ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत

0
1585
बातम्या शेअर करा

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण येथे बोगस नोटांची ‘हुबेहूब छपाई करून त्या मुंबई ,ठाणे येथे या नोटा वटविण्यासाठी आलेल्या टोळीच्या म्होरक्याला ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाचने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या चौकशीतून इतर दोन साथीदारांच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या त्रिकुटाकडून ८५ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या असून या आरोपींनी यापूर्वी बाजारात बनावट नोटा बटविल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

चिपळूण येथील कळंबट गावात राहणारा सचिन आगरे याने गावातच प्रिंटर, स्कॅनर आणि कॉम्प्युटरच्या मदतीने बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा थाटला होता. या ठिकाणी त्याने दोन हजार रुपये दराच्या बनावट नोटा छापल्या. या नोटा सचिन ठाण्यात वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, अनिल सुरवसे, भूषण शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे, देविदास जाधव, पोलीस हवालदार राजेश क्षत्रिय, विजयकुमार गोव्हे, मनोज पवार, शिवाजी रायसिंग, दिलीप शिंदे, शशिकांत नागपुरे, राजेंद्र गायकवाड, अजित शिंदे, कल्पना तावरे, सागर सुरळकर, यश यादव या टीमच्या मदतीने कापूरबावडी येथे सापळा रचला. या ठिकाणी नोटा घेऊन आलेल्या सचिन याला पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या.

सचिनला अटक करताच त्याचे साथीदार मन्सूर खान व चंद्रकांत माने या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून एकूण ८५ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. चलनात आलेल्या नव्या नोटा बनावट पद्धतीने छापून वटविणाऱ्या अनेक टोळ्या आतापर्यंत जेरबंद करण्यात आल्या आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here