चिपळूण – चिपळूण तालुक्यातील खड्पोली एमआयडीसी येथील नामकीत कृष्णा केमिकल कंपनीसमोर एका टेलरने सात दुचाकी गाड्याचा चुराडा करण्याची घटना घडली त्यामुळे कामगार वर्गात नाराजी पसरली होती मात्र टेलर मालकाने दुचाकीची सर्व भरपाई भरून देण्याचे कबूल केल्यानंतर प्रकरण मिटले असले तरी कंपनीच्या समोरील पार्कींगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खडपोली येथील कृष्णा केमिकल कंपनीच्या नव्या कंपनीत दुसऱ्या गेट समोर कामगार वर्ग यांच्या दुचाकी उभ्या होत्या याचवेळी एक टेलर गाडी गेटसमोर पार्कींग केली होती मात्र पार्कींग करताना हॅन्डबेल्ट ओढण्याचा विसरून गेला आणि अचानक सकाळी 11 च्या सुमारास उतारात असलेला टेलर अचानक सुरू झाला आणि त्याचठिकानी उभा असलेल्या सात दुचाकींना एकापाठोपाठ या सात दुचाकी गाड्याचा चुराडा केला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात गाड्याचे नुकसान झाले त्यामुळे कामगार वर्ग संतापला आपल्या गाड्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी कंपनी मॅनेजर यांच्याकडे कामगार मागणी करू लागले सुरुवातीला कंपनीने हात झटकले मात्र काही वेळातच काही राजकीय नेते घटनास्थळी दाखल झाले मात्र कंपनीच्या मॅनेजर यांनी त्याना भेटण्यास नकार दिला अखेर पोलीस घटनास्थळी आले मात्र जोपर्यंत कोणीही तक्रार देऊ शकत नाहीत तोपर्यंत कारवाई करू शकत नाहीत अशी भूमिका पोलिसांनी घेतली त्यानंतर कंपनी कामगार व टेलर मालक यांच्यात संयुक्त बोलणी होऊन जेव्हढे नुकसान झाले आहे तेवढे देण्याची तयारी टेलर मालक यांनी दाखवल्यानंतर हा विषय मिटला मात्र तालुक्यात नामवंत असलेल्या कृष्णा केमिकल कंपनीच्या दुचाकी पार्कींगचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अद्याप कंपनीने कामगार वर्गाला पार्कींगची व्यवस्था करून दिली नाही त्यामुळे असे अपघात घडत आहेत याबाबत कंपनीचे मॅनेजर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट नाकारली तर फोनवर संपर्क साधला नाही कंपनीच्या पार्कींग विषयावरून ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहेत