स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ ; नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा तातडीने घेण्याचे उच्च तंत्र शिक्षण विभागाचे आदेश

0
335
बातम्या शेअर करा

मुंबई – (उमेश कदम ) – मराठवाड्यात नावाजलेल्या अशा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे हिवाळी सत्र परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तातडीने पुनर्परीक्षा घ्या आणि यापुढे विद्यार्थ्यांच्या भविष्य सोबत खेळू नका असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हिवाळी सत्र परीक्षेत चुकीच्या पद्धतीने परीक्षा पद्धत राबविल्याने या हिवाळी सत्र परीक्षेत तब्बल 92 टक्के विद्यार्थी नापास झाले या विद्यापीठाने ऐच्छिक विषयाच्या परीक्षा ही एकाच दिवशी ठेवल्याने विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन पेपर द्यावे लागेल परिणामी अभ्यासाचा ताण येऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली आणि त्याचा फटका हा विद्यापीठाच्या निकालावर झाला. या विद्यापीठाने यंदा बी.ए, बीएस्सी ,बीकॉम या अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्र परीक्षेत थेअरी पॅटर्न लागू केल्यानंतर एका दिवशी ऐच्छिक विषयाचे दोन पेपर घेतले या बदलाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि विद्यापीठाचा हिवाळी सत्र परीक्षेत विद्यापीठाचा निकाल घसरला या बाबत अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती याच नाराजीची दखल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली यांनी नुकतीच या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले कुलसचिव सर्जेराव शिंदे व सिनेट सदस्य सरस मोरे यांची मुंबईत बैठक घेतली तसेच तसेच यापुढे एकाच दिवशी दोन पेपर न घेता एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश दिले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या भोंगळ कारभाराबद्दल त्वरित लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय दिल्याने विद्यार्थी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here