गुहागर ; जलयुक्त शिवार योजनेवर तब्बल 4 कोटी खर्च मात्र त्या गावात अद्याप पाणी टंचाई..?

0
308
बातम्या शेअर करा

गुहागर – (मंगेश तावडे ) – भाजप सरकारच्या काळात २०१६-१७ पासून तीन वर्षे गुहागर तालुक्यात राबविलेल्या शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेवर तब्बल ३७५.९७ लाख खर्च करण्यात आले असून एकूण १२ गावे त्यासाठी निवडण्यात आली होती. परंतु, एवढा खर्च करूनही या गावातील पाणी पातळीत फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. त्यामुळे
सन २०१५-१६ मध्ये गुहागर तालुक्यातील धोपावे, हेदवी, मळण, साखरी त्रिशुळ व वेलदूर या पाच गावात १६६ जलयुक्त शिवाराच्या कामावर २६३.३४ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

सन २०१६-१७ मध्ये वेळणेश्वर, कोंडकारूळ व काताळे या तीन गावात या कामातील एकूण ४६ कामांना मंजुरी घेण्यात आली व त्यावर १०५.४२ लाख रुपये खर्च करण्यात आले. सन २०१७- १८ ला तालुक्यातील निवोशी व जामसुत या दोन गावातील २४ कामावर ४६.४३ लाख रुपये, तर २०१८-१९ या वर्षात उमराठ व चिखली या गावांतील ३८ कामावर तब्बल ६०.७८ लाख रुपये खर्च करण्यात आले. सर्व मिळून
या चार वर्षात तालुक्यातील १२ गावांत झालेल्या जलयुक्त शिवार या योजनेवर ३७५.९७ लाख रुपये खर्च झाले आहेत. जलयुक्त शिवार योजनेची गुहागर तालुक्यात एवढी कामे होऊन व त्यावर एवढा खर्च करून तालुक्यातील टँकरची संख्या मात्र कमी झालेली नाही. धोपावे, साखरी त्रिशुळ, वे लदूर, कोंडकारूळ, काताळे, उमराठ, जामसुत या गावातून आजही पाण्याचे दुर्भिक्ष असून यातील अनेक गावातून आजही टँकर चालू आहेत. त्यामुळे या गावातून झालेल्या कामाच्या दर्जावर जनतेतून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here