जळगाव – मागील काही दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर भाजप पक्ष सोडला व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
23 ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढेल. भाजपात झालेल्या अन्यायामुळे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.