चिपळूण – विनापरवाना बंदूक वापरून जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एकूण ७ जणांना चिपळूण पोलिसांनी मध्यरात्री तालुक्यातील शिरवली व मिरवणे रस्त्यावर घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अटक केली असून तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पकडलेल्या ७ जणांकडून २ विनापरवाना बंदूक, २ चारचाकी वाहने,बॅटरी ,जिवंत काडतुसे असा एकूण २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री गस्तीवरील पोलिसांना तालुक्यातील शिरवली रोड येथील रस्त्यावर मध्यरात्री ४ वाजता एका बोलेरो पिकअप गाडीतून काही तरुण जंगल परिसराकडे जात असल्याचे दिसले.गाडीत सहाजण होते. पोलिसांनी गाडी अडवून चौकशी केली असता त्यांच्याकडे विनापरवाना ,२२ हजाराची १२ बोअर ची डबल बॅरल बंदूक ३६० रुपये किमतीचे जिवंत काडतुसे ,१०० रुपये किमतीची बॅटरी आढळून आली. या तरुणाची हि सगळी तयारी शिकारीची असल्याचेच चौकशीत निष्पन्न झाले. त्यांना अटक करण्यात आली. त्यामध्ये आदित्य अनंत चव्हाण, , अमर सदाशिव चव्हाण संकेत अनंत चव्हाण , तिघे रा. ओमळी चव्हाणवाडी), चेतन सदानंद चव्हाण , ढोकमळी, सोहम कैलास कदम , सागर अशोक वाघमारे दोघे रा. वाणीआळी चिपळूण यांचा समावेश असून त्यांच्याकडून बारा बोअरची सिंगल बॅरेल बंदूक, जिवंत काडतुसे, आदी साहित्य व व शिकारीसाठी वापरण्यात येणारी गाडी जप्त केली या सर्वांना न्यायालयात हजर केले असता बुधवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर दुसऱ्या घटनेत मिरवाने – शिरवली बायपास रोडवर रात्री वाजता पोलिसांना गस्ती दरम्यान निलेश अशोक लाड ( शिरवली- साहणवाडी), राजेश सत्यवान लाड, तेजस सत्यवान लाड आज यश (पूर्ण नाव माहीत नाही) हेचौघे बोलेरो मॅक्स पिकअप घेऊन विनापरवाना बंदूक बाळगून जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी जाताना सापडले. यातील दोन जण पळून गेले त तर निलेश याला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून बंदूक काडतूस
व गाडी आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले . या प्रकरणी निलेश याला न्यायालयात हजर केले असता बुधवरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.