गुहागर – (मंगेश तावडे ) राज्यात कोरोना संक्रमण होऊन रुग्ण वाढू नये यासाठी राज्य सरकारने अद्यापही शालेय कोचिंग क्लासेस किंवा अन्य कोणत्याही कोचिंग क्लासेसला परवानगी दिली नाही. मात्र असे असतानाही गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे मात्र राजरोसपणे कोचिंग क्लास सुरू असल्याचे बातमी प्रगती टाइम्सने प्रसिद्ध करताच या परिसरात खळबळ माजली व याचं बातमीचा आधार घेत शुंगारतळी सरपंच संजय पवार यांनी शोध मोहीम घेतली असता येथील सई इन्स्टिट्यूट मध्ये बेकायदेशीर पणे कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे दिसले त्यावेळी त्यांनी त्वरीत या सई इन्स्टिट्यूटचे मालक सुमीत आडमकर यांना हे कोचिंग क्लास बंद करायला सांगितले त्यामुळे शुंगारतळीत कोचिंग क्लासेस सुरू होते ते मात्र या प्रकारेमुळे पुढे आले.
राज्य सरकारने अनलॉक 5 साठी महत्त्वाच्या गाईडलाईनस जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील हॉटेल रेस्टॉरंट बंद होते. मात्र अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असताना आता 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंदच राहणार आहेत.
शासनाचे असे आदेश असतानासुद्धा शुंगारतळी येथील सई इन्स्टिट्यूट मध्ये जुलै महिन्यापासून कोणतीही परवानगी नसताना असे क्लासेस सुरू असल्याचे उघडकीस झालं. त्यामुळे या क्लासेस वर कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
शुंगारतळी येथील सई इन्स्टिट्यूट येथे अनेक गावातील विद्यार्थी एकत्र येऊन क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले.
ज्यावेळी मी तेथे गेलो त्यावेळी क्लासरूम मध्ये कोचिंग क्लासेस चालू होते. कोणतेही सोशल डिस्टन्स न ठेवता विद्यार्थी एकत्र होते. कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हते तर सर्व विद्यार्थी मिळून जवळ पास 30 ते 35 जण एकत्र होते.त्यावेळी तेथील शिक्षकाला विचारले असता आम्ही जुलै महिन्यापासून या ठिकाणी कोचिंग क्लास घेत आहोत असे त्यांनी सांगितले. मात्र आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेतो असे त्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून जी खबरदारी घ्यायची असते ती त्याठिकाणी दिसली नाही. त्यामुळे त्वरित आम्ही या कोचिंग क्लासेस बद्दल वरिष्ठांकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. भविष्यात या कोचिंग क्लासेसमुळे शृंगारतळी आणि शुंगारतळी परिसरात कोरोना संक्रमण होऊन रुग्ण वाढले तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे कोचिंग क्लासेसचे मालक असतील.तसेच आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अजून माहिती गोळा करून त्या कोचिंग क्लासेस बद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सरपंच संजय पवार यांनी सांगितले.