चिपळूण – चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली येथे भक्षाचा पाठलाग करत विहीरीत पडून बिबटयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिबटयांसह वन्यप्राण्यांच्या मृत्यूंचे प्रमाण तालूक्यात वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
ढोक्रवली सुतारवाडी येथील मनोहर महाडीक यांच्या मालकीच्या विहीरीवर काल सकाळी वीज मोटर सुरू करण्यासाठी गेलेले असताना त्यांना बिबटया पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबतची माहिती गावडे येथील वनविभागाला कळवल्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेश्री किर, वनसंरक्षक रानबा बंबर्गेकर यानी घटनास्थळी जाऊन मृत बिबटयाला ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. साधारण साडेतीन वर्षाचा आणि पूर्ण वाढ झालेला नर जातीचा मृत बिबटया होता.