गुहागर ;तालुका अध्यक्षविना राष्ट्रवादी पोरकी ? वरिष्ठांचे दुर्लक्ष

0
413
बातम्या शेअर करा

गुहागर – (मंगेश तावडे ) -गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून गुहागर तालुकाध्यक्षपद रिक्त आहे. मात्र पक्षाच्या वरिष्ठांनीही या विषयात लक्ष न घातल्याने व तालुकाध्यक्ष पद नक्की कोणाच्या वादात अडकले आहे. याची चर्चा सद्या गुहागर तालुक्यात सुरू आहे.

गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी गुहागर तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत सर्व जि. प. व पं. स. सदस्य, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हेही गेले. निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यात मोठा धक्का बसला. अशावेळी पक्षाने ज्येष्ठ कार्यकर्ते व जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र हुमणे यांच्याकडे तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. हुमणे यांनीही पक्षाच्या पडत्या काळात आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत चांगल्याप्रकारे तालुकाध्यक्ष पद सांभाळले. मात्र, आपल्या वाढत्या वयोमानामुळे पहिल्यासारखी धावपळ करणे शक्य नसल्याने त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
त्याच वेळी गुहागर विधानसभा निवडणुकीत बाबाजी जाधव यांनी या मतदारसंघात मोठी कामगिरी करत आपले मतदार व कार्यकर्ते कसे राष्ट्रवादी राहिती याची काळजी घेतली मात्र असे असताना सुद्धा गेले अनेक महिने तालुका अध्यक्षपद रिक्त राहिल्याने गुहागर तालुक्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडण्याच्या मनस्थिती असल्याचे कळते.
तालुकाध्यक्ष पदाचा हा विषय खासदार सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या कानावरही घालण्यात आला आहे. मात्र, त्यांनीही तालुकाध्यक्ष पदाचा तेढा सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसत नाही.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here