वाई ; उपविभागीय पोलीस अधिकारीपदी डॉ. शीतल जानवे यांनी पदभार स्वीकारला

0
769
बातम्या शेअर करा

वाई – (प्रवीण गाडे)- सातारा जिल्ह्यातील वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी डॉ शितल जानवे यांनी आज पदभार स्वीकारला. या आधी त्यांनी कोकणातील चिपळूण येथे व राज्य गुप्तवार्ता या ठिकाणी महत्वपूर्ण कामगिरी करून एक वेगळा ठसा उमटविला आहे.

आपल्या शासकीय कारकीर्दीची सुरुवात गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर, कोल्हापूर येथून पंचायत समिती पन्हाळा येथून केली. २००८ ते २००१३ या कालावधीत त्यांनी येथे काम केले. यावेळी २०११ मध्ये त्यांनी पोलीस उपाधिक्षकपदासाठी एमपीएससीची परीक्षा दिली. याच परीक्षेत त्या पास झाल्या. त्यानंतर नाशिक येथे ट्रेनिंग झाल्यानंतर २०१३ पासून त्या पोलीसउपाधिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सुरुवातीला त्यांनी यवतमाळ येथे प्रोबेशनरी पोलिस उपाधिक्षक म्हणून पोलीस सेवेला सुरवात केली.त्यानंतर नाशिक, रत्नागिरी, चिपळून, खेड येथे त्यांची नियुक्ती झाली. चिपळूण आणि खेड या दोन डिव्हिजनमधील नऊ ठाण्यांचा कार्यभार त्यांच्याकडे होता . पुढे त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात अप्पर उपआयुक्त म्हणून काम केले. नुकतीच त्यांची तुरची (जिल्हा सांगली) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये उपप्राचार्य म्हणून नेमणूक झाली होती. तेथून त्यांची सातारा जिल्यातील वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारपदी त्यांची नियुक्ती झाली असून त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला.त्यांच्या कारकीर्दीस शुभेच्छा देण्यासाठी आज अनेकांनी गर्दी केली होती.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here