मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात आता होण्यास सुरुवात झाली आहे.
गेले अनेक दिवस भाजप आणि खडसे यांच्यात काही अलबेल नसल्याचे अनेक गोष्टींवरुन दिसून आले होते. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातही शाब्दिक युद्ध झालेले देखील सगळ्यांनी पाहिले आहे. भाजपचे इतके ज्येष्ठ नेते अजूनही त्यांना पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची खंत वेळोवेळी एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली होती. तर ४५ वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपमध्ये सक्रिय काम केल्यानंतरही किंमत मिळत नसल्याचे खडसे भाजपला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.