बातम्या शेअर करा

रत्नागिरी – कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व रेल्वे बंद ठेवण्यात आल्या होत्या, त्याच बरोबर कोकण रेल्वेही बंद ठेवण्यात आली होती . मात्र त्याचा फटका कोंकणवासीयांना बसला. आता मात्र कोकणात 26 तारखेपासून रेल्वे धावणार हे आज कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

कोकण रेल्वे पुन्हा सुरू होणार असल्याने ही कोकणवासीयांच्या दृष्टिने समाधानाची बाब आहे.
कोकणासाठी असलेली दादर -सावंतवाडी -दादर ही गाडी स्पेशल ट्रेन म्हणून येत्या २६ सप्टेंबर पासुन ३१ऑक्टोबर पर्यंत पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. तशी माहिती मध्यरेल्वेकडून देण्यात आली आहे. ही गाडी १ नोव्हेंबर नंतर नेहमीच्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. या गाडील ४ जनरल डबे असणार आहेत. पण कोविडच्या नियमानुसारच गाडी आरक्षित करुन प्रवास करता येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे लाखो चाकरमान्यांची मागणी पुर्ण झाली आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here