गुहागर नगरपंचायतीची शहरातील 36 बहुमजली इमारत धारकांना स्ट्रक्चर ऑडीटची नोटीस

0
323
बातम्या शेअर करा

गुहागर – महाड येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बहुमजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे. असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशानुसार गुहागर नगरपंचायतीने शहरातील 36 बहुमजली इमारत धारकांना स्ट्रक्चरल ऑडीट करून अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली आहे.

गुहागर शहरातील 36 बहुमजली इमारती बरोबर पंचायत समिती इमारतीचेही स्ट्रक्चरल ऑडीट करावे लागणार आहे. बांधकाम विभागाच्यावतीने याची अंमलबजावणी केली जाणार आहे. परवानाधारक अभियंत्यांकडून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल कार्यालयाकडे सादर करावयाचा आहे. यासाठी नगरपंचायतीने त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या 5 अभियंत्यांची नावे दिली आहेत. गुहागरात शहरात आधीपासून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरु आहे. त्यातच आता बहुमजली इमारतींना नोटीसा आल्याने शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here