चिपळूण: चिपळूण येथील कामथे रुग्णालयात मुस्लिम समाज संस्था व रोटरी क्लब चिपळूणने दानशूर व्यक्ती व संस्थांच्या सहाय्याने सुसज्ज अशी यंत्रणा उभी केली आहे, तसेच कळंबणी रुग्णालयातून ९ नर्स कामथे रुग्णालयात शिफ्ट केल्या जाणार आहेत, याठिकाणी कळंबणी येथून सहा वेंटिलेटर व चार मोठे ऑक्सीजन सिलेंडर पुरविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज दुपारी झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
कामथे रुग्णालयाचे काम उत्तम आहे. याठिकाणी आयएमएसह पाच खाजगी डॉक्टरही कामथे उपजिल्हा रुग्णालयाला सहकार्य करत आहेत. सध्या ७० ते ८० सक्रिय रुग्ण या ठिकाणी आहेत. यापुढे कामथे उपजिल्हा रुग्णालय रत्नागिरीप्रमाणे यापुढे जिल्हा कोविड हॉस्पिटल म्हणून काम करेल, अशी माहितीही जिल्हाधिकारी यांनी या वेळी दिली.