चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले होमिओपॅथिक कोरोनाचे केअर सेंटर चिपळूण तालुक्यातील पेंढाबे येथे सुरू झाले आहे. जवळपास २९ बेडचे केअर सेंटर असून ३-४ ऑक्सिजन बेड आहेत. त्याचे उदघाटन माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या हस्ते झाले.
या कोरोना केअर सेंटरमध्ये होमिओपॅथीक तज्ञ डॉ. शिवाजी मानकर व अन्य चार नामवंत डॉक्टरांच्या सहकार्याने कोरोना रुग्णाची लक्षणे जाणून घेऊन त्याच्यावर उपचार करणार आहेत. होमिओपॅथीक औषधे घेतल्यानंतर पाच ते सहा दिवसात रुग्ण बरा होतो. आतापर्यंत ३०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे केले आहेत, असे डॉ. शिवाजी मानकर यांनी सांगितले.