मुंबई -परप्रांतीयां विरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी शिवसेनेला साद घातली, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म सूत पुत्रा’, अशा शब्दात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसनेसा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘राज ठाकरे हे ठाकरे ब्रॅण्डचा एक घटक आहेत. मराठी, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी सगळ्या ठाकरेंनी एकत्र यावे’, अशी साद शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना दिली होती. त्यावर संदीप देशपांडे यांनी आता उत्तर दिलं आहे
ज्यावेळी राज ठाकरे हे परप्रांतीयांविरोधात लढत होते, तेव्हा शिवसेनेचे नेते गप्प होते. पाकिस्तानी कलाकारांविरोधात आम्ही लढत होतो, तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात आमचे सहा नगरसेवक चोरले गेले, तेव्हा शिवसेनेने डाव साधला. 2014 आणि 2017 मध्ये राज ठाकरेंनी परप्रांतीयांवोराधात लढण्यासाठी शिवसेनेला साद घातली होती, तेव्हा शिवसेना गप्प होती. महाभारतात जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं, त्यावेळी कृष्णाने जे कर्णाला सांगितलं ते आता मला सांगावंसं वाटत आहे, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म सूत पुत्रा’, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली.