गुहागर – कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वीजग्राहकांना कोरोना काळात आलेली बिले, त्यांनी भरलेली ऑनलाइन बिले,प्रत्यक्षातले मिटर रीडींग व आता आलेली वाढव बिले यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली तफावत ,आढळणा-या त्रुटी यामुळे संभ्रम निर्माण झाले असून ते दूर करण्याकरता महावितरणच्या तालुका ठीकणी असणा-या गुहागरच्या प्रमुख कार्यालयात मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील वीज ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. या वाढत्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची लागण होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.
गुहागर तालुक्यातून ही आलेली गर्दी असल्यामुळे त्याचा प्रसार होण्यास वेळ लागणार नाही. तरी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन गुहागर तालुक्यामध्ये गुहागर, पालशेत, तळी, रानवी, तळवली, अाबलोली ही आपली सहा शाखा कार्यालय आहेत. त्या शाखा कार्यालयाच्या ठिकाणी वीज ग्राहकांसाठी तातडीने मदत केंद्रे सुरू करावीत. म्हणजेच तालुकावासियांचा वेळ, पैसा याचा भुर्दंड वाचेल व कोरोना संसर्गाचे लागण – प्रसार होणार नाही. याकरता तालुक्यातील आपल्या सहा शाखा कार्यालयातून विज ग्राहकांसाठी मदत केंद्रे सुरू करण्याची मागणी म.रा.वि.वि.कंपनीचे कार्यकारी अभियंता,चिपळुण व उपअभियंता गुहागर यांच्याकडे भाजप गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यानी केली आहे.