चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात २ सप्टेंबरपासून ८ दिवसांचा लॉकडाऊन केला जाणार आहे. अशी अफवा सध्या संपूर्ण चिपळूण बाजारपेठेत पसरली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून अशाप्रकारे ८ दिवसांचा लॉकडाऊन करण्याबाबतचा कुठलाही आदेश अथवा सूचना आलेली नाही, असे संबंधितांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चिपळूणवासीयांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.